करोना महामारीत स्वतःला सावरण्यासाठी तुकाराममहाराजांचं मनोविज्ञान प्रत्येक पावलावर उपयुक्त ठरतं!
महामारीपेक्षा तिच्या अवास्तव धास्तीनंच अधिक लोक दगावल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. ‘कुछ हैजा (कॉलरा) से तो कुछ हैबत (भीती) से मरे’ या लोकोक्तीप्रमाणे आजारापेक्षा त्याची धास्तीच अनेकांना मरण्यासाठी पुरेशी असते. म्हणून महामारीत औषधांएवढंच मनोबल महत्त्वाचं ठरतं. मनोबल वाढवण्यासाठी जगाच्या बाजारात कोणतंही औषध उपलब्ध नाही. त्यासाठी आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलावा लागतो.......